Skip Navigation
The Endowment for Human Development
The Endowment for Human Development
Improving lifelong health one pregnancy at a time.
Donate Now Get Free Videos

Multilingual Illustrated DVD [Tutorial]

The Biology of Prenatal Development
प्रसूतिपूर्व विकासाचे जीवशास्त्र

.मराठ [Marathi]


National Geographic Society This program is distributed in the U.S. and Canada by National Geographic and EHD. [learn more]

Choose Language:
Download English PDF  Download Spanish PDF  Download French PDF  What is PDF?
 

The Fetal Period (8 Weeks through Birth)

Chapter 37   9 Weeks: Swallows, Sighs, and Stretches

जन्मापर्यंत गर्भावस्थेचा काल असतो

९ आठवडयानंतर अंगठा चोखण्यास सुरवात होते. गर्भ ऍम्नीओटिक द्रव गिळू शकतो.

गर्भ वस्तु पकडू शकतो, मस्तक पुठे-भागे हलवू शकतो, जबडा उधडू शकतो, बंद करु शकतो, जीभ हलवू शकतो, दिर्घ श्वास सोडू शकतो व ताणू शकतो.

चेहर्याचे मज्जातन्तु व हाताचे तळवे आणि पायांच्या तळभागाला हलका स्पर्श जाणवतो.

पायाच्या तळभागाला केलेल्या हलक्या स्पर्शाचा प्रतिसाद म्हणून गर्भ नितंब व गुडधे किंवा बोटे वळवीतो.

पापण्या आता पूर्णतया बंद असतात.

घशामधील आवरणाची निर्मिती स्वरयंत्राच्या विकासाच्या प्रारंभाची रवूण आहे.

स्त्री-गर्भात गर्भाशय सुस्पष्टपणे दिसतो पुनरुत्पादनाच्या ओगोनिया नावाच्या अविकसीत पेशी बीजदाणीत निर्माण होतात.

बाह्य जननेंद्रिय पुरुष वा स्त्री असल्याप्रमाणे सुस्पष्ट होऊ लागतात.

Chapter 38   10 Weeks: Rolls Eyes and Yawns, Fingernails & Fingerprints

9 व 10 आठवटयामधील तीव्र वाढीमुळे शरीराचे वजन 75 प्रतिशत वाढते.

10 आठवडयानंतर, वरच्या पापणीला उत्तेजित केल्यास डोळा खाली सरकतो

गर्भ जांभई देतो आणि नेहमी तोंड उघडतो व बंद करतो

बहुतेक गर्भ उजवा अंगठा चोखतात.

गर्भनालिकेतील आतडयांचा छेद पोटातील पोकळीत परत जातो.

अधिकतर हाडांची ऑसीफिकेशन द्वारा निर्मीती सुरू असते.

वोटांची व अंगठयाची नखे वाढण्यास सुरवात होते.

गर्भधानांतर 10 आठवडयांनी बोटांचे विशिष्ट ठसे प्रकट होतात. हे ठसे ओळख पटविण्यासाठी आयुष्यभर उपयोगी पडतात.

Chapter 39   11 Weeks: Absorbs Glucose and Water

11 आठवडयानंतर नाक व ओठ पूर्णतया तयार होतात अन्य शरीर अवयवांप्रमाणे त्यांचे स्वरूप मनुष्याच्या जीवन चक्राच्या प्रत्येक अवस्थेत बदलते.

आतडे गर्भाने गिळंकृत केलेले ग्लुकोज व पाणी शोषण्यास सुरवात करते.

लिंग जरी गर्भाधानाच्यावेळी निश्चित होते, आता बाह्य जननेंद्रिय स्त्रीची वा पुरुषाची असल्याप्रमाणे स्पष्टपणे ओळखली जाऊ शकता.

Chapter 40   3 to 4 Months (12 to 16 Weeks): Taste Buds, Jaw Motion, Rooting Reflex, Quickening

11 व 12 आठवडयाचे दरम्यान गर्भाचे वजन 60 प्रतिशत वाढते.

बारा आठवडयानंतर प्रथम तिमाहीचा किंवा गर्भावस्थेच्या तिमाहीचा काल पूर्ण होतो.

तोंडाच्या आतील बाजूवर स्वाद-बिंदु प्रकट होतात.
जन्मानंतर, स्वाद-बिंदु फक्त जीभ व तोंडाच्या टाळूवर राहतील.

12 आठवडयाच्या आसपास आतडयाच्या हालचाली सुरू होऊन सुमारे सहा आठवडे सुरू राहतात.

गर्भाच्या व नवजाताच्या आतडयानी प्रथम बाहेर फेकलेल्या पदार्थास मेकोनिअम म्हणतात. ते पाचक स्त्राव, प्रथिने आणि पचनसंस्थेच्या मार्गाने टाकलेल्या मृत पेशींच बनलेले आहे.

बारा आठवडया नंतर हातांची लांबी शरीराच्या आकाराच्या अंतिम अनुपाता एवढी झालेली असते. पायांना त्यांच्या अंतिम आकाराएवढे होण्यास जास्त वेळ लागतो.

पाठीचा व शिर्षस्थ भागाचा अपवाद वगळता गर्भाचे संपूर्ण शरीर आता हलक्याशा स्पर्शाला प्रतीसाद देते.

लैंगीकता आधारित विकासात्मक फरक पहिल्यांदाच प्रकट होतात. उदाहरणार्थ स्त्री-गर्भ पुरुष-गर्भापेक्षा खूप जास्त वेळा जबडयाच्या हालचाली करतो.

या आधी आढळलेल्या मागे जाण्याच्या प्रतिसादाचे ऐवजी तोंडाजवळील उद्दीपन आता उद्दीपकाचे दिशेने वळणे व तोंड उघडणे असा प्रतिसाद निर्माण करते. या प्रतिसादाला रूटिंग प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात ती जन्मानंतर कायम रहाते आणि नवजात शिशुला स्तनापानाच्या दरम्यान त्याच्या आईची स्तनाग्रे शोधण्यास मदत करते.

गाल मासंल होउ लागल्याने चेहरा परिपूर्ण होणे सुरू रहाते आणि दातांची वाढ सुरू होते.

१५ आठवडयानंतर रक्त निर्माण करण्यार्या रक्तपेशी येतात आणि हाडांच्या पोकळीत संवर्धित होतात. सर्वाधिक रक्तपेशींची निर्मिती येथे होवे.

जरी सहा आठवडयाच्या गर्भाच्या हालचाली सुरू होतात गर्भवती स्त्रीला गर्भाच्या हालचाली १४ ते १८ आठवडयाच्या दरम्यान प्रथम जाणवतात. पारंपरिकरित्या हया घटनेस क्विकनिंग म्हणतात

Chapter 41   4 to 5 Months (16 to 20 Weeks): Stress Response, Vernix Caseosa, Circadian Rhythms

१६ आठवडयानंतर गर्भाच्या पोटात सुई टाकण्याची क्रिया तणावचा प्रतिसाद असणारे हॉरमोन निर्माण करते आणि रक्तप्रवाहात नॉरएड्रिनालिन अथवा नॉरएपीनफ्राइन सोडते. नवजात व प्रौढ़ आक्रमक कार्यपहदर्तांना एकसारखा प्रतिसाद देतात.

श्वसन संस्थेत वायुनलिकांचे जाके आता जवळजवळ पूर्ण झालेले असते.

व्हर्निक्स कसेसा नावाचा संरक्षक शुभ्र पदार्थ आता गर्भाला वेढून टाकतो व्हर्निक्स ऍम्नीओरिक द्रवाच्या उद्दीप्त परिणामांपासून त्वचेचे रक्षण करते.

१९व्या आठवडयापासून गर्भाच्या हालचाली, श्वसन क्रिया आणि हृदयाचे स्पंदन सिर्काडिअन नावाच्या दैनिक चक्राचे अनुसरण करण्यास प्रारंभ करते.

Chapter 42   5 to 6 Months (20 to 24 Weeks): Responds to Sound; Hair and Skin; Age of Viability

२० आठवडयानंतर कोचेला नावाचे श्रवणेंद्रिय पूर्ण विकसीत झालेल्या आतल्या कानामधे प्रौढ़ा प्रमाणे पूर्ण आकाराचा होतो. इथून या पुठे गर्भ ध्वनिच्या वाढत्या श्रेणीला प्रतिसाद देईल.

मस्तकावर केस वाढण्यास सुरवात होते.

रोमाछिद्र आणि ग्रंथीसह सर्व त्वचा स्तर आणि अवयव उपस्थित असतात.

गर्भाधानानंतर २१ ते २२ आठवडयांचे दरम्यान फुफ्फुसे श्वसन करण्याची क्षमता प्राप्त करतात. हा जीवनक्षमतेचा अवधी मानला आहे कारण गर्भाशया बाहेर अस्तित्व कायम राखणे काही गर्भांना शक्य होते. वैद्यकीय प्रगतीच्या दिर्घक्रमामुळे समयपूर्व जन्मलेल्या शिशुंचे आयुष्य वाचवणे शक्य झाले आहे.

Chapter 43   6 to 7 Months (24 to 28 Weeks): Blink-Startle; Pupils Respond to Light; Smell and Taste

२४ आठवडयानंतर पापण्या पुन्हा उघडतात आणि गर्भ ब्लिंक-स्टार्टल प्रतिसाद देऊ लागतो. अचानक व मोठया आवाजांची ही प्रतिक्रिया स्त्री गर्भात ळवकर विकसीत होते.

अनेक संशोधकांना आढळले आहे की तीव्र ध्वनी गर्भाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतो. तत्काल परिणामात, लंबित वर्धित हृदयगती, गर्भाची सूज आणि वर्तनातील विस्कळीत बदल यांचा समावेश होतो. संभाव्य दिर्घकालीन परिणामात बहिरेपणाया समावेश होतो.

गर्भाची प्राणघातक श्वसन-गती प्रति मिनिट ४४ श्वास-उच्छवासा एवठी वाढू शकते.

गर्भावस्थेच्या तिसर्या तिमाहीचे दरम्यान गर्भाने उपयोग केलेल्या उर्जेच्या ५० टक्कयांपेक्षा जास्त उर्जा मेंदूच्या गतिमान वाढी करता वापरली जाते. मेंदूचे वजन ४०० ते ५०० पटीने वाढते.

२६ आठवडयानंतर डोळयात अश्रुजल निर्माण होते.

२७ आठवडयाचे दरम्यान बाहुली प्रकाशाला प्रतिसाद देऊ लागते. आयुवयभर नेत्रपटलापर्यन्त पोहचणारा प्रकाश हया प्रतिसादामुळे नियंत्रित होतो.

वासाचे संवेदन सक्रिय होण्या करता आवश्यक असलेले सर्व घटक काम करू लागतातं. समयपूर्व जन्मलेल्या शिशुंचे अध्ययनात गंध ओळखण्याची क्षमता गर्भाधानानंतर २६ व्या आठवडयांनी दिसते.

गर्भाशयातील द्रवात मधुर पदार्त ठेवल्यास गर्भाचो द्रव गिळण्याची गती वाढते. या उलट कडू पदार्थ ठेवल्याने गर्भाची द्रव गिलण्याची गती मंद होते. पायांची पायर्या चढल्याप्रमाणे हालचाल

वारंवर केल्यानंतर चेहर्यावर भाव परिवर्तन होते चालल्याप्रमाणे गर्भ कोलांटउडया मारतो.

त्वचेखाली अधिक चरबी जमा झाल्याने गर्भाच्या सुरुकुत्या कमी होतात. शरीराचे तापमान सुरक्षित राखण्यात आणि जन्मानंतर ऊर्जा संग्रहण करण्यात चरबीची महत्वपूर्ण भूमिका असते.

Chapter 44   7 to 8 Months (28 to 32 Weeks): Sound Discrimination, Behavioral States

२८ आठवडयांनंतर गर्भ तीव्र व मंद कंपनश्रेणीच्या ध्वनींत फरक करू शकतो.

३० आठवडयानंतर श्वासोश्वासाच्या हालचाली नित्याच्या होतात आणि सामान्य गर्भाचे ३० ते ४० टक्के समयात होतात.

गर्भावस्थेच्या शेवटच्या चार महिन्याच्या दरम्यान गर्भ समन्वित हालचाली अधूनमधून विश्रांती घेत काही काळ करतो. वर्तनाच्या या अवस्था मध्यवर्ती मज्जा संस्थेच्या सतत वाढत्या व्यामिश्रता दर्शवतात.

Chapter 45   8 to 9 Months (32 to 36 Weeks): Alveoli Formation, Firm Grasp, Taste Preferences

ठोबळमानाने ३२ आठवडयानंतर वायुकोष, वा हवेचे कप्पे असलेल्या पेशी फुफ्फुसात विकसीत होण्यास सुरवात होते. जन्मानंतर आठ वर्षापर्यंत त्या निर्माण होत रहातात.

३५ आठवडयानंतर गर्भाची हातापी पकड पक्की होते.

विविध पदार्थांशी गर्भाचा परिचय जन्मानंतरच्या चवीच्या आवडी-निवडीकर परिणाम करतो. उदाहरणार्थ ज्या गर्भांच्या आईने सौफचा (एक पदार्थ जो लिकॅरिसला स्वाद देतो) स्वाद घेतला असतो ते जन्मानंतर सौफ खाणे पसंद करतात. गर्भावस्थेत सौफशी परिचय न झालेल्या नवजातांना सौफ आवडत नाही.

Chapter 46   9 Months to Birth (36 Weeks through Birth)

एस्ट्रोजेन नामक हार्मोनची निर्मिती करून गर्भ श्रम करण्यास सुरवात करतो आणि यापद्दतीने गर्भावस्थेतून नवजात अवस्थेकडील स्थित्यंतराचा प्रारंभ करतो.

प्रसूतीचा वेळी गर्भाशयाचे जोरदार संकोचन होते व परिणामी शिशुचा जन्म होतो.

गर्भधानापासून जन्मापर्यन्त व नंतर मानवी विकास गतिमान, निरंतर व व्यामिश्र आहे. या आश्चर्यमुग्ध करणार्या प्रक्रियेचे नवे संशोधन वाढत्या प्रमाणात गर्भ विकासाचा प्रभाव आयुष्यभरच्या आरोग्यावर दर्शवते.

आपले प्रारंभिक मानवी विकासाचे ज्ञान जसे वृद्धिंगत होइल तशी आपली जन्मापूर्वीचे व जन्मानंतरचे आरोग्य वर्धित करण्याची क्षमता वाढेल.


Add a Comment

Your Name: Log In 3rd-party login: Facebook     Google     Yahoo

Comment: